सोमवार, २५ एप्रिल, २०१६

।। ध्यान करिता गळाले मन ।।(१)

                           

                 विदेही संत श्री संतामाई ह्या कोळी समाजात जन्मल्या होत्या . परमार्थाचे संस्कार दुर्मिळ तरीही पूर्वसंचिताचा ठेवा म्हणून त्यांना आनंद संप्रदायाचे   ब्र्हमाज्ञानी सद्गुरु श्री साख्यानंद महाराजांचा अनुग्रह मिळाला . आणि गुरुकृपेने त्यांना अभंग रचना स्फुरू लागली त्या सहज काव्यात्मक भाषेत रचना करीत आणि त्यांचे शिष्य ते क्रमश: लिहून घेत असत . त्यांचे एकूण २५०० अभंग प्रसिध्द आहेत . विशेष म्हणजे त्या शाळेत कधीही गेल्या नव्हत्या तरीही संस्कारी बुद्धीतून तत्वज्ञानात्मक रचना पाझरू लागली …. तरीही साहित्यिकांचे याकडे लक्ष नाही कारण संतामाई या सर्व सामान्य समाजातील आहेत त्यामुळेही अभिजात साहित्यिक याचा विचार करीत नसावेत . त्यांच्या अभंगात वेदांत सहज आणि सोप्या भाषेत सांगितलेला आपल्याला आढळतो . परिचयातील दृष्टांत सांगून सिद्धांत पटविण्याची त्यांची हातवटी विलक्षण आहे . त्यांच्या अभंगामध्ये मानसशास्त्रीय विवेचन सुद्धा आढळते . तसेच ध्यान साधनेविषयी सुद्धा मार्गदर्शन असते कारण सर्व ज्ञान हे ध्यानाच्या माध्यमातूनच येते म्हणून ध्यान साधना हि महत्वाची ठरते . उदहरण म्हणून आपण एक अभंग पाहूयात । 
ध्यान करिता गळाले मन । नाही देहाची आठवण ।।१।।
सापडली गुरुकिल्ली । स्वरुपात बुडी दिली ।।२।।
बाहेर निघाया नको वाटे । झाली आनंदाची भेट ।।३।।
सखयाकृपे  संती म्हणे । नका हिंडो आडराने ।।४।।

ध्यान साधनेकरीता यम , नियम ,आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा ,ध्यान समाधी . हि अष्टांग योगाची सामुग्री लागतेच पण सहज साधनेकरीता अष्टांग योगातील सर्व सामुग्री असावीच असा आग्रह नाही . तुम्ही सहज आसन घालून पाठीचा कान ताठ ठेवून आणि स्वसोच्छासाकडे लक्ष केंद्रित करून सोहम भाव करून त्याकडे लक्ष द्यावे . तो मंत्र म्हणजे अजपाजप ," अजपाजप उलट प्राणाचा । तेथेही मनाचा निर्धारु असे ।।" -हरिपाठ . अशा प्रकारे तुमचे ध्यान सिध्द होऊ लागले कि मग तुमचे मन हे मनपना धरीत नाही त्याचे संकल्प विकल्प हळू हळू बंद होतात . मनाचे देह तादात्म्य सुटते व हा अनुभव म्हणजेच गुरूची किल्ली आहे कि ज्यामुजले आपण स्वरुपात लीन होऊन जातो व पुन्हा त्या सुखातून बाहेर निघू वाटत नाही सखयाची सन्ति म्हणते कि हा इतका सोपा मार्ग सोडून आडरानात फिरू नका . 

 …… क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा